Home / Uncategorized / राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

 चिखली | मेघा जाधव 

चिखली : येथील स्थानिक राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिखली येथे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली . गोपाळा गोपाळा ll देवकीनंदन गोपाळा ll हे भजन ऐकताच आपल्याला आठवतात ते फक्त गाडगेबाबा, गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. अशा या महान संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या प्राचार्य दीपा वाघ व प्रमुख पाहुणे कल्पना देशमुख, शुभांगी जोशी यांनी केले. ” साधी राहणी , उच्च शिकवण l बाबा तुम्ही जगाला शिकवली ! स्वच्छतेचा मंत्र पुकारुन l भारतीय संस्कृती टिकवली “! संत गाडगेबाबा हे एक थोर मराठी संत आणि समाजसुधारक होते . जातीभेद निर्मूलन,सार्वजनिक स्वच्छता, अस्पृश्यता निर्मूलन, शैक्षणिक कार्य ,विविध कीर्तने असे महान कार्य संत गाडगेबाबा यांनी केले. इयत्ता चौथी वर्गाच्या वर्गशिक्षिका निवेदिता झाल्टे यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा जयंती निमित्त सुंदर असे नृत्य सादर केले. तसेच शहरोज खान फिरोज खान, इमदाद सौदागर, शितल ठिगळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे इंग्लिश हिंदी, मराठी मध्ये भाषणे दिली .तसेच कल्पना देशमुख यांनी देखील संत गाडगेबाबा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. यामध्ये युहान सय्यद यांने संत गाडगे बाबांची वेशभूषा केली . शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी “स्वच्छता अभियान मोहीम ” राबविली. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदी किरण करवंदे व शीतल संतोष ठिगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सावी बाजे हिने केले. संस्थेचे अध्यक्ष तथा चिखली शहराचे नगराध्यक्ष श्री .पंडित दादा देशमुख, उपाध्यक्ष किशोर दादा दहिवाळ ,सचिव श्री कमल किशोर लांडगे , रघुनाथ पवळ सुनील देशमुख, चेतन देशमुख, ज्योतीताई देशमुख ,वैशालीताई देशमुख शाळेच्या प्राचार्या दीपा वाघ यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार