छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
डिजे टाळून पारंपरिक वाद्यांसह शांततेत मिरवणूक काढण्याचे;सपोनि शेषराव उदार यांचे आवाहन
सिल्लोड शहर येथे दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांदे, आनंद पगारे, वंदना हिवराळे, सुनील चंदेल उपस्थित होते यांच्या उपस्थितीत आगामी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान शिवजयंती उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,
“मिरवणुकीदरम्यान डिजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून शांततेत उत्सव साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य होऊ देऊ नये. सर्व समाजघटकांनी परस्पर सहकार्य ठेवून उत्सव आनंदात साजरा करावा.”
तसेच रमजान महिन्याचा सन्मान राखत दोन्ही उत्सव काळात धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन, मिरवणूक मार्ग, वेळापत्रक, ध्वनीमर्यादा तसेच स्वयंसेवकांची नेमणूक याबाबतही सूचना देण्यात आल्या.
याबाबत माहिती देताना महिला समुपदेशन केंद्राचे विशाल पाईकराव व आनंद पगारे यांनी सांगितले की, शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व समिती सदस्य व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या बैठकीमुळे सिल्लोड शहरात शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वास नागरिकांत व्यक्त होत आहे.






