छ. संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार

लिंबगाव तालुका पैठण येथील कुमारी गीता निर्मळ हिने दिनांक 28 डिसेंबर 2025 मध्येNMMS(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा(2025-26) दिली होती तिचा निकाल दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला या परीक्षेमध्ये कुमारी गीता गजेंद्र निर्मळ हिने 179पैकी136 गुण मिळवून पैठण तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला ती संजीवनी कोचिंग क्लासेस ची विद्यार्थीनींआहे लिंबगाव सारख्या छोट्याशा खेडेगावातून येऊन तिने पैठण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला तिला हे यश कठोर परिश्रम सातत्याने योग्य मार्गदर्शन यामुळेच मिळालं आहे या यशाचे श्रेय आई वडील तसेच गुरुजनवर्ग आणि मैत्रिणींना दिले आहे मला पुढे हइंजिनियर व्हायचं आहे असे तिने लोक महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या मिळालेल्या यशामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि अभिनंदन करण्यात येत आहे






