Home / Uncategorized / इद्रिस मुलतानी यांची अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी पुनर्निवड; सिल्लोडमध्ये उत्साहाचे वातावरण…

इद्रिस मुलतानी यांची अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी पुनर्निवड; सिल्लोडमध्ये उत्साहाचे वातावरण…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत

सभापती उत्तम चव्हाण यांच्याकडून इद्रिस मुलतानी यांचा भव्य सत्कार; भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

सिल्लोड व सोयगावचे लाडके नेते इद्रिसजी मुलतानी पुन्हा प्रदेशाध्यक्ष

सिल्लोड शहरात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा. श्री. इद्रिसभाऊ मुलतानी यांची पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या इद्रिसजी मुलतानी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने ठाम भूमिका घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या पुनर्निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नुकतेच विजयी झालेले सभापती उत्तम महारू चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन इद्रिस मुलतानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहीन इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, प्रा. जीवन कोलते पाटील, राहुल राठोड, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभापती उत्तम चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, इद्रिसभाऊ मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक मोर्चाने राज्यभर प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि सर्वसमावेशक भूमिकेमुळे पक्ष अधिक बळकट झाला असून पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वात समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इद्रिस मुलतानी यांनीही सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत ही जबाबदारी अधिक ताकदीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. “पक्षाने दिलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आणि सर्वसमावेशक राजकारणासाठी मी कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.
सत्कार सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. सिल्लोड शहरात या पुनर्निवडीचे स्वागत करण्यात येत असून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार