Home / Uncategorized / श्री संत मोहन महाराज बाप्पू जयंतीनिमित्त महाप्रसाद व भजन कार्यक्रम उत्साहात

श्री संत मोहन महाराज बाप्पू जयंतीनिमित्त महाप्रसाद व भजन कार्यक्रम उत्साहात

 

कारपा प्रतिनिधी : विनोद चव्हाण

कारपा येथे श्री संत मोहन महाराज बाप्पू यांच्या जयंतीनिमित्त बस स्टॅन्ड कारपा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी गावातील भक्तगण व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री सरजू प्रल्हाद चव्हाण, श्री सुभाष मदन चव्हाण, श्री शिवलाल कनीराम चव्हाण, श्री विजय प्रल्हाद चव्हाण, श्री राजू प्रल्हाद चव्हाण, श्री विनोद उत्तम चव्हाण, श्री पंकज काशीराम चव्हाण, श्री प्रवीण चरण चव्हाण, श्री संदीप काशीराम चव्हाण, श्री रणजीत शिवलाल चव्हाण, श्री पवन चरण चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

जयंतीनिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर बंजारा भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले. शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जयंती सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार