Home / Uncategorized / भरधाव ट्रकची दुचाकीला धडक…एक मजूर जागीच ठार; एक गंभीर जखमी; प्रशासनाचे दुर्लक्ष

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक…एक मजूर जागीच ठार; एक गंभीर जखमी; प्रशासनाचे दुर्लक्ष

 

जळगाव ब्योरो चीफ छत्रपती : संभाजीनगर उपसंपादक गोकुळसिंग राजपूत 

पहूर (ता. जामनेर) 

– छत्रपती संभाजीनगरकडून जळगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील साई हॉटेलसमोर सोमवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता घडला.

शेतातून मका कापणीचा सौदा करून घरी परतत असताना ईश्वर भानुदास सोनवणे (वय ४५) व शाम यादव चौधरी (वय ३०) यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच १९ डीबी २९५०) मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच २० सीटी ८०५३) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी चेंडूप्रमाणे सुमारे ७ ते १० फूट उंच उडाली. या अपघातात मागे बसलेले ईश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शाम चौधरी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारालाही ट्रकची धडक बसली; मात्र प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला

महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी तात्काळ जखमींना आपल्या दुचाकीवरून सरकारी दवाखान्यात हलवले. दरम्यान, पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला इमरान भाई या ऑटोचालकाने पाठलाग करून मेट्रो वाईन शॉपजवळ पकडले.

मद्यप्राशन करून ट्रक चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताचे भाऊ ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक दिलीप प्रभाकर राखटे (करंजखेडा, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालयातील गैरसोय; नागरिक संतप्त

ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर १०८ ॲम्बुलन्स येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. पहूर ग्रामीण रुग्णालयात केवळ एकच रुग्णवाहिका कार्यरत असून दुसरी ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्यावी, तसेच रुग्णालयात आवश्यक सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शिवनगर परिसरात शोककळा

मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ईश्वर सोनवणे यांच्या निधनाने शिवनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी १०.०० वाजता शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जखमी शाम चौधरी यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

धार्मिक ऐक्याचे दर्शन

अपघाताच्या वेळी हिंदू-मुस्लिम भेद न ठेवता मदत करणाऱ्या सद्दाम शेख व इमरान शेख यांच्या तत्परतेमुळे माणुसकीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले.

गतिरोधकांची मागणी

गावालगत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी सूचनाफलक, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग व सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महिला अध्यक्ष तथा पत्रकार गिता भांमरे यांनी बोलताना सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार