Home / Uncategorized / राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त माणुसकी वृद्ध सेवालय येथे अन्नदान व अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त माणुसकी वृद्ध सेवालय येथे अन्नदान व अभिवादन

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी श्रीपत पवार

माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे व सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा जटवाडा रोड येथे उपस्थित मान्यवरांनी गाडगेबाबांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली.व प्रशांत गायकवाड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन अन्नदानाची सेवा दिली.समाजसेवक सुमित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे.बाबांचे प्रेरणादाई विचार संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार. अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा, जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो, दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका, दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा, दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही, धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका, माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप, माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी माणुसकीला लय ग्रहण केला आहे, शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे उपस्थिताना सुमित यांनी गाडगेबाबा यांचे विचार सांगीतले. यावेळी उपस्थित माणुसकी समुहाचे सभासद समाजसेवक सुमित पंडित,प्रशांत खंडुजी गायकवाड, अशोक ग्राम,समाजसेविका सौ. पूजा पंडित, लक्ष्मी पंडित व वृध्दाश्रमातील सर्व वृद्ध उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार