Home / Uncategorized / परीक्षा संपत आली… पण पालकांच्या जागरूकतेची खरी परीक्षा आता सुरू!”

परीक्षा संपत आली… पण पालकांच्या जागरूकतेची खरी परीक्षा आता सुरू!”

 

परीक्षेनंतर मुल,मुली पळून जाण्याच्या घटनांत वाढ?

पालकांनी सतर्क राहावे – माजी उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांचे आवाहन

चिखली प्रतिनिधी : १० वी व १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर काही ठिकाणी प्रेमसंबंधांमुळे मुल-मुली घरातून निघून जाण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की परीक्षेचा ताण संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक मोकळेपणा मिळतो. या काळात भावनिक निर्णय घेण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा त्यांच्या मित्रपरिवार, हालचाली, सोशल मीडिया आणि मानसिक स्थितीकडे संवेदनशीलपणे लक्ष द्यावे.

👨‍👩‍👧 पालकांनी काय करावे?

कपिल खेडेकर यांनी पुढील बाबींवर भर दिला

मुलांशी नियमित व विश्वासू संवाद ठेवावा

परीक्षा काळात व त्यानंतर मुलींना शक्यतो एकटे पाठवणे टाळावे

कुणी आपल्या मुलीबद्दल माहिती देत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये

समाजाच्या भीतीपोटी वस्तुस्थिती नाकारू नये

शिक्षक व समुपदेशकांचा सल्ला घ्यावा

“कधी कधी जवळचे नातेवाईक किंवा मित्र काळजीपोटी पालकांना सतर्क करतात; मात्र त्याचा गैरसमज करून घेतला जातो हे टाळणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

⚠️ कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे?

✔ अचानक वागण्यात बदल

✔ मोबाईल/सोशल मीडियाचा अतिवापर

✔ घरच्यांपासून गोष्टी लपवणे

✔ अचानक बाहेर जाण्याची घाई किंवा कारणे

ही चिन्हे दिसल्यास रागावू नका समजून घ्या.

❤️ काय करू नये?

✘प्रेम प्रकरण माहिती असूनही दुर्लक्ष करूu नका

✘ मुलांवर अवाजवी संशय घेऊ नका

✘ सार्वजनिकपणे अपमान करू नका

✘ समाजाच्या भीतीने वस्तुस्थिती नाकारू नका

✘ संवाद बंद करू नका

भीती आणि दबावामुळे मुले अधिक दुरावू शकतात.

 

भावना समजून घ्या, पण निर्णय योग्य घ्या

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे.

परंतु या नाजूक टप्प्यावर घेतलेले घाईचे निर्णय त्यांच्या शिक्षणावर आणि भविष्यातील संधींवर परिणाम करू शकतात.

पालकांनी कठोर भूमिका न घेता

प्रेमाने संवाद साधावा

विश्वासाचे वातावरण निर्माण करावे

योग्य-अयोग्य याची जाणीव करून द्यावी

असे आवाहन करण्यात आले.

🌼 समाजासाठी सामूहिक जबाबदारी

“आपली मुलगी पेपरला गेली तर तिच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या. ती कुठे जाते, कोणासोबत असते, याची माहिती ठेवा; पण हे सर्व प्रेमाने आणि विश्वासाने करा,” असे भावनिक आवाहन खेडेकर यांनी केले.

📞 मोफत ऑनलाईन समुपदेशनाची सुविधा

या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत आमचे सहकारी मित्रवर्य प्रशांत ढोरे पाटील यांनी मुला-मुली व पालकांसाठी कुठलीही फी न घेता मोफत ऑनलाईन समुपदेशन उपलब्ध करून दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

परीक्षेनंतर मुलांमध्ये भावनिक गोंधळ किंवा संभ्रम असल्यास किंवा पालकांना योग्य मार्गदर्शन हवे असल्यास, या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कपिल खेडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

“योग्य वेळी संवाद आणि समुपदेशन मिळाले तर अनेक अनुचित प्रकार टाळता येऊ शकतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षेनंतरचा काळ हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

या काळात पालक, शिक्षक आणि समाज यांनी सजग राहून संवादाचे पूल मजबूत केले तर अनेक नकारात्मक घटना रोखता येऊ शकतात. मोफत ऑनलाईन समुपदेशनासाठी 7507759777 या नंबर वर व्हॉट्सॲप द्वारे या नंबर वर संपर्क साधा असे सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार