Home / राजकारण / कोट्यवधी खर्च करून, सत्तेत आलेले लोक जनतेच्याच खिशातून 100 पट वसुली करतील. सौ.विद्या सुनील धंदर पाटील यांचा घणाघात..!

कोट्यवधी खर्च करून, सत्तेत आलेले लोक जनतेच्याच खिशातून 100 पट वसुली करतील. सौ.विद्या सुनील धंदर पाटील यांचा घणाघात..!

चिखली | प्रतिनिधी उमा जैवाळ

नगराध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अपक्ष उमेदवार सौ.विद्या सुनील धंदर पाटील यांनी दिलेल्या आक्रमक स्टेटमेंटमुळे चिखलीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. निवडणुकीत अफाट पैशांचा वापर करून सत्तेत आलेल्यांवर त्यांनी थेट आरोप करत, हा विजय लोकशाहीचा नसून पैशांच्या बळावर मिळवलेला असल्याची टीका केली आहे.
“आज जे लोक कोट्यवधी रुपये खर्च करून सत्तेत आले आहेत, ते उद्या हेच पैसे मतदारांच्याच खिशातून शंभरपट वसूल करतील,” अशी प्रतिक्रिया विद्याताईंनी निवडणूक जिंकणाऱ्या आणि अमाप पैसे खर्च करून निवडणूक लढविणाऱ्या इतर पराभूत पक्षांच्या उमेदवारांवर केली आहे.

‘मी एक रुपयाही मतदारांवर खर्च केला नाही; लोकशाही वाचवण्यासाठी लढले याचा मला अभिमान आहे.’ मतदारांना कुठलाही दोष न देता मतदारांनी सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पैसे वाटप करणाऱ्या उमेदवारांना मतदान न करण्याचा संकल्प करावा व पैसे वाटप न करणाऱ्या उमेदवारांना मतदान करावे.मतदारांना पैशाची गरज नसताना पैसे वाटप केल्या जातात.आणि सुशिक्षित, जागरूक मतदार पैसे घेत नाही परंतु ते सुद्धा अशा उमेदवारास मतदान करतात जो की भ्रष्टाचार करून मिळवलेले पैसे वाटप करतो.पैसे वाटप करणाऱ्या उमेदवारांनाच प्रामाणिक मतदार मतदान करतात म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करून भ्रष्टाचार करणाऱ्याच्याच पापात सहभागी होतात. कधीतरी एकांतात बसून या गोष्टीचा विचार करावा आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्याना मतदान करून चुकीचा निर्णय तर घेत नाही ना? खरच येणारी पीढी आपल्याला माफ करेल का?भ्रष्टाचार करणारे जेवढे दोषी असतात तेवढेच दोषी त्यांना मतदान करणारे मतदार.पैसे वाटप न करणाऱ्या उमेदवारांना मतदान दिले तरच लोकशाही वाचेल.

सौ.विद्या सुनील धंदर पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“मी ही निवडणूक एक रुपयाही खर्च न करता लढवली. मतदार अमाप पैसे खर्च करणाऱ्या उमेदवारांविषयी चर्चा करतात पैसा वाटायला नको असे म्हणत त्यांनाच मतदान करतात.मी मतदारांना मतदान करण्यासाठी पर्याय म्हणून उभी होते.मी सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात उतरले आणि हा लढा इथेच थांबणार नाही.येणारी पुढील प्रत्येक निवडणूक देखील लढविणार तीही एकही रुपया खर्च न करता,तेंव्हा निश्चितच सर्व सामान्य जनता माझ्या सोबत राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानत, हा जनतेचा विश्वास आयुष्यभर जपण्याची ग्वाही दिली.
नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या कराच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांबाबत बोलताना विद्याताईंनी स्पष्ट भूमिका मांडली.
“जनतेच्या टॅक्सच्या पैशातून होणारी प्रत्येक विकासकामे दर्जेदार, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असली पाहिजेत. यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे.चुकीचे व निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास ते काम थांबवून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई साठी प्रयत्न करणार”

यासोबतच त्यांनी नागरिकांनाही आवाहन करत सांगितले की,“प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रभागातील कामांवर विशेष लक्ष ठेवावे, प्रश्न विचारावेत आणि चुकीला विरोध करावा.”
सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा देत विद्या धंदर पाटील म्हणाल्या की,
“सत्ता कोणाचीही असो, पण जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरला गेला पाहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देणार.”

सौ.विद्या सुनील धंदर पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे निवडणूक निकालानंतरही चिखलीतील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान उभे झाले आहे एव्हढे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार