Home / Uncategorized / श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न

श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न

देऊळगाव राजा (प्रतिनिधी): दत्ता हांडे

स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम गिरोली बुद्रुक येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबीराच्या समारोप समारोह प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी हे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर गिरोली चे सरपंच संजय कव्हळे, ग्रामसचिव अधिकारी बाळकृष्ण तिडके, उपसरपंच भरत झिने, ग्रामपंचायत सदस्य विष्णू शिंदे, जि. प. उ. प्रा. शाळा गिरोली बुद्रुक येथील शिक्षक कारभारी चित्ते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर माने उपस्थित होते. प्रमुख अतिथी ह. भ. प. झगरे गुरुजी महाराज यांनी आपल्या खास कीर्तनाच्या शैलीमधून विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. वेळेचे नियोजन, समय सुचकता, विद्यार्थ्यांची कर्तव्ये आणि जबाबदारी या विषयी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी प्रबोधन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजना ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी अजूर्न वाघमारे व विष्णू शळके या स्वयंसेवकांनी तर साक्षी माने व प्रांजल खार्डे या स्वयंसेविकांनी शिबिरातील आपले अनुभव शब्दबद्ध केले.                      संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सूचनेनुसार महाविद्यालयाच्या रासेयो युनिटने सात दिवशिय निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम गिरोली बुद्रुक येथे अनेक विधायक उपक्रम राबविले. यामध्ये पाणलोट व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन जनजागृती, संविधान जागर अभियान इत्यादी तसेच विविध बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. शिबिर समारोप समारोहाचे सूत्रसंचालन कु. भक्ती लटके या विद्यार्थिनीने केले. प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर माने यांनी केले. अतिथी परिचय सहकार्यक्रम अधिकारी डॉ. दीक्षापुत्र बिऱ्हाडे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती ढोकले यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ छायाराजे विजयसिंह जाधव तसेच प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. जि. प. उ. प्रा. शाळा गिरोली बुद्रुक येथील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व शाळा समिती अध्यक्ष यांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये सहकार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल जाधव, प्रा. सौ. सीमा धुळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार