संभाजीनगर प्रतिनिधी – श्रीपत पवार
सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच माणुसकी समूहाच्या सहकार्याने माणुसकी वृद्ध सेवालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात कुमारी लक्ष्मी पंडित हिने शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंती निमित्त माणुसकी समूहाच्या वतीने वृद्ध सेवालयातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे सेवालयात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमास भास्कर पंडित, सुमित पंडित, विजय निंबाळकर, प्रथमेश पंडित, पूजा पंडित तसेच समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






