Home / Uncategorized / तहसील कार्यालयात तक्रार न स्वीकारल्याचा आरोप; संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी

तहसील कार्यालयात तक्रार न स्वीकारल्याचा आरोप; संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी

 

सिंदखेडराजा : मुन्ना ठाकूर 

येथील तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्याने तक्रार स्वीकारण्यास नकार देत तक्रारदाराशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तक्रारदार विश्वनाथ सोमाजी विर (रा. हिवरखेड पूर्णा, ता. सिंदखेडराजा) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १६ फेब्रुवारी रोजी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत निवेदन देण्यासाठी ते तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी आवक-जावक विभागातील कर्मचारी भागिले यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. तसेच “वरिष्ठांनी कोणतीही तक्रार घ्यायची नाही” असे सांगून अपमानास्पद वागणूक दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत तहसील प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार