Home / Uncategorized / सिडको पोलीस स्टेशन हद्दीतील दोघांना पुणे मनोरुग्णालयात उपचारासाठी माणुसकी टिम चे मदतकार्य

सिडको पोलीस स्टेशन हद्दीतील दोघांना पुणे मनोरुग्णालयात उपचारासाठी माणुसकी टिम चे मदतकार्य

छ. संभाजीनगर प्रतिनिधी श्रीपत पवार

रेणुका माता मंदिर परिसरात दहशितीचे वातावरण निर्माण करीत होता मनोरुग्ण… 

सदर मनोरुग्ण व्यक्ती नामे मुकुंद कल्याणकर राहणार एन ९ शिवाजीनगर हडको परीसरातील स्थानिक नागरिकांनी

सिडको पोलीस स्टेशन येथे वारंवार माहिती दिली कि सदर व्यक्ती हा हिंसक वागत आहे.व दगडे हातात घेऊन मारहाण करित आहे.व रात्री बेरात्री परिसरात फिरतो जोरजोरात ओरडतो रोडवरील चालु वाहनांना आडवतो गार्डन मधील लोखंडी बाकडे त्याने राग ने तोडफोड केली आई वडीलांना सतत शिवीगाळ करतो वडीलांच्या पायावर त्याने या आगोदर कुऱ्हाड सुध्दा मारली होती

त्यापासून लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.व तो बऱ्याच दिवसापासून मनोरुग्ण सारखे वागत आहे.

त्याचे आई वडील वृद्ध आहे.त्यांना देखील मारहाण करतो. त्यास पोलीसांच्या मदतीने व या.कोर्टाच्या आदेशाने या अगोदर हि येरवडा पुणे येथे तीन वेळा दाखल केले होते परंतु त्याचा मानसिक आजार आता जास्त झाल्याने तो धिंगाणा घालत आहे.अशि माहिती परिसरातील नागरिकांनी व त्यांचे वडील यांनी सिडको पो.स्टे ला दिली असता सिडको पोलीस स्टेशन चे उप पोलीस निरिक्षक निवृत्ती गायके यांना दिली.व दुसरा पेशंट मयुर गोरे हा व्यसनाच्या आहारी गेल्याने घरातील तोडफोड करने आई वडिलांना त्रास देने व गावातील लोकांना त्रास देणे असे कृत्य करत होता.सिडको पोलीसांनी सदर मनोरुग्णासाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना माहिती दिली.सुमित यांनी तात्काळ पो.स्टे.सिडको येथे जाऊन परिसरात पेशंट ला शोधुन शाहनीशा केल्यावर सदर रुग्ण मुकुंद हा मोठमोठे केस व दाढि वाढकुन जोरजोराने ओरडत होता.सदर रुग्णाला ताब्यात घेणे मोठे अवघड झाले होतो.तो हिंसक वृत्ती चा असल्याने कोन्हाला जवळहि येवुन देत नव्हता सदर मनोरुग्ण यास उपचारासाठी पुणे येथे घेऊन जावे सोपे नव्हते सुमित पंडित यांनी शासकीय रुग्णालय घाटि मानस उपचार तज्ञ श्री प्रसाद देशपांडे यांचा सल्ला घेतला व त्यास सिडको पोलीसांच्या मदतीने त्यास माणुसकी समुहाच्या टिम ने त्यास हात पाय बांधून ताब्यात घेतले व शासकीय रुग्णालय संभाजीनगर घाटी रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ यांनी औषधोपचार करून त्यास पुढिल उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथे नेण्याचा सल्या डाँक्टरांनी दिल्यानंतर कायदेशीर कागदोपत्री पुर्तता करुन आज त्यास येरवडा पुणे येथे १०८ अँबुलंस वाहनाने उपचारासाठी माणुसकी टिम च्या सभासदांनी मदतकार्य करुन उपचारासाठी दाखल केले.अतुल येरमे पोलिस निरीक्षक,गायकवाड सहाय्यक पोलिस निरीक्षक ,यांच्या मार्गदर्शनाखाली नीवृत्ती गायके उपपोलीस निरिक्षक,व १०८ अँबुलंस डि.एम.अतुल मुरुगकर,ए डि.एम.सचिन पालवे,डॉ किरण देशमुख,माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित,प्रशांत गायकवाड आदिंनी मदतकार्य केले,

 

माणुसकी समुहाचे कार्य मनोरुग्णानसाठि लाख मोलाचे

मनोरुग्णांच्या जवळ देखील कोणी जायला तयार होत.हे आम्ही स्वतः अनुभवले नाही ते खूप सेन्सिटिव्ह असतात कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात परंतु समाजसेवक सुमित पंडित करत असलेल्या रंजल्या गांजल्यांच्या सेवा ही खरंच वाखाडणे योग्य आहे.

मनोरुग्णानसाठि ते स्वतःदाढी कटिंग व स्वच्छ अघोळ घालुन त्यांना माणसात आणतात व त्यांना हक्काचा निवारा मिळवून देतात आज प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी त्यांना या मनोरुग्णाच्या कोणी जवळही जाण्याची हिंमत करत नव्हते त्याप्रसंगी समाजसेवक सुमित पंडित यांनी मोठे हिमतीने त्या कायदेशीर प्रक्रीया करुन

उपचारासाठी पुणे येथे दाखल केले आहे.पोलीसांना सुमित पंडित हे रात्री बेरात्री फोन केला की नि स्वार्थ भावनेने मदतीसाठी तयार असतात त्यांची पोलीसांना वेळोवळी मदत होत आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार समाजात अशी खूप कमी लोक आहेत की ते दुसऱ्यासाठी जगतात..

– अतुल येरमे पोलिस निरीक्षक सिडको पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार