Home / Uncategorized / पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात साकारला स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार

पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात साकारला स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार

  1. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

वैजापूर ता,१८

आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला,गुण,कौशल्ये यांना  गीत,संगीत,व परंपरागत वाद्याच्या ताल व सुरावर  सादर करीत पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयाच्या मुलां-मुलींनी आपली कला मनसोक्तपणे सादर करून उपस्थित पालक,पाहुणे,व अतिथींची मनं

जिंकली.बुधवार(ता,१८)रोजी सादर झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन  जायेंटस ग्रुप ऑफ

वैजापूर सहेलीच्या सौ.अंजली जोशी यांनी दीप प्रज्वलन करून केले.प्रथम महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत ,सेवा निवृत्त मुख्याध्यापक जी. जी.राजपूत व शिक्षण पर्यवेक्षक बी.बी.जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नीता पाटील होत्या. अंत्यत रंगलेल्या या स्नेहसंमेलनात पालक वर्ग आपल्या पाल्यांच्या गुण,कौशल्य व कलेत रमून गेले होते. या विद्यालयाला पांच लॅपटॉप मिळाले म्हणून शिक्षिका सुवर्णा बोर्डे व विद्यार्थीनी श्रेष्ठा कुलकर्णी यांचा गुणगौरव करण्यात आला.अत्यंत बहारदार सूत्र संचलन शिक्षिका ज्योती दिवेकर यांनी करून पालकांची मने जिंकली,अंजली जोशी, धोंडीराम राजपूत व बी बी.जाधव यांची समयोचित भाषणे झाली.शिक्षक सुभाष गोमलाडू, संदीप शेळके, राजश्री बंड, लता सुखासे, सुनीता वसावे,पंकजा भाकरे,श्री राठोड, तारा होलप,श्रीमती राजपूत,श्रीमती सोनवणे यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार