छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत ब्युरो चीफ
वैजापूर ता,१५
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४०जवानांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिन निमित्त वैजापूरात शनिवार(ता,१४) रोजी या शहीद वीरांच्या
स्मरणार्थ अभिवादन कार्यक्रम सम्पन्न झाला.ऑल इंडिया पॅरामिलिटरी फोर्सेस एक्स सर्व्हिसमेन वेलफेअर असोसिएशन वैजापूरच्या वतीने आयोजित या पुण्य स्मृती स्मरण कार्यक्रमात राज्यातील विविध ठिकाणचे सेवा निवृत्त फौजी मोठ्या संख्येने उपस्थित होते,तसेच वीर पत्नी ,वीर पिता व वीर माता,सामाजिक कार्यकर्ते,सेंट मोनिका इंग्लिश स्कुल चे एन. सी.सी, छात्र,करुणा निकेतन शाळेचे स्काऊट छात्र ही सहभागी झाले होते.प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,महात्मा जोतिबा फुले पुतळा,पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुतळा,महाराणा प्रतापसिंह पुतळा जागा येथे सर्वांनी अभिवादन केलें. पंचायत समिती प्रांगणात प्रथम वीर पत्नी,वीर पिता, वीर माता, सेवानिवृत्त फौजी ,समाज कार्यकर्ते यांचा गौरव करण्यात आला.प्रास्तविक आयोजक ऑल इंडिया पॅरामिलिटरी फोर्सेस चे गौतम गायकवाड व अशोक पाटील यांनी केले.सूत्र संचलन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठा. धोंडीरामसिंह राजपूत यांनी करून सेवा निवृत्त फौजी साठी जागेची मागणी व शहीद स्मारक मागणी केली ,यावर उपस्थित तालुक्याचे आ.रमेश पा.बोरनारे यांनी पन्नास लक्ष रुपये देण्याची घोषणा केली तर नगराध्यक्ष डॉ.दिनेश भाऊ परदेशी यांनी हुतात्मा स्मारक येथे जागा देणाची घोषणा केली.या समयी गौतम गायकवाड, अशोक पाटील,जवाहर कोठारी, दत्तात्रय सोनवणे,कादरी यांनी मनोगत व्यक्त केले.आयोजक गौतम गायकवाड यांनी वीर पत्नी याना सन्मान चिन्ह,साडी चोळी,व तिरंगा पट्टी देऊन गौरविल,समाजकार्यकर्त्या सितामावशी गायकवाड व
धोंडीरामसिंह राजपूत यांनाही स्मृती चिन्ह,शाल व तिरंगा पट्टी देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी
नगरसेवक साबेरखान,प्रकाश चव्हाण,डॉ.अमोल अन्नदाते,सरपंच दौलत गायकवाड,पुंडलिक गायकवाड व राज्यातील सेवा निवृत्त फौजी सोपानराव देवकर( संघटना सचिव),किशोर पाटील,सोपान गाढे,नितीन त्रिभुवन, काशिनाथ कदम,शिवाजी पोटे,दादासाहेब थोरात,अशोक थेटे, अशोक ढवळे, रामदास पाटील,अशोक संगेवर, रामदास चाटे,रमेश वसावे,सुमनबाई गायकवाड,जिजाबाई गायकवाड, श्रीमती देवकर,श्रीमती थोरात,श्रीमती बागुल,श्री बनकर,प्रकाश माळी,निलेश पारख,राजू पठाण यांच्या सह राज्यातील जालना,बुलढाणा, अहिल्यानगर,नाशिक,जळगाव इत्यादी जिल्ह्यातील माजी सीआरपीएफ जवान उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली







