Home / Uncategorized / देव्हारीत विजयी उमेदवारांचा जल्लोष; सरपंच तेजराव जाधव यांच्या पुढाकारातून उत्तम चव्हाण–माहिन मुलतानी यांचा भव्य सत्कार

देव्हारीत विजयी उमेदवारांचा जल्लोष; सरपंच तेजराव जाधव यांच्या पुढाकारातून उत्तम चव्हाण–माहिन मुलतानी यांचा भव्य सत्कार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

दिलेला शब्द पाळणारच!” — देव्हारीत विजयी उमेदवारांचा गावभर मिरवणुकीत जंगी सत्का

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ग्राम संसद देव्हारी येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद गणाचे विजयी उमेदवार अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांची मुलगी माहिन इद्रिस मुलतानी व उत्तम महारु चव्हाण यांच्या विजयाचा आनंद ग्रामस्थांनी उत्साहात साजरा केला.

या वेळी देव्हारीच्या सरपंच राधाबाई तेजराव जाधव, कृषी मित्र तेजराव जाधव, विठ्ठल चव्हाण, माजी सभापती मिराबाई उत्तम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तसेच असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा वाजत-गाजत भव्य सत्कार व मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावातून जल्लोषात काढलेल्या या मिरवणुकीत नागरिकांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे स्वागत केले.

या प्रसंगी उत्तम चव्हाण, माहिन मुलतानी व राहुल जाधव यांचा पुष्पहार, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सत्काराला उत्तर देताना उत्तम महारु चव्हाण म्हणाले,

“देव्हारी व परिसरातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत भरघोस मतांनी विजयी केले. हा विश्वास आम्ही कधीही तुटू देणार नाही. निवडणुकीदरम्यान दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू. विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड होऊ देणार नाही.”

यावेळी माहिन इद्रिस मुलतानी यांनीही ग्रामस्थांचे आभार मानत सांगितले की,

“हा विजय जनतेचा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरू. देव्हारीसह संपूर्ण गणाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांकडून विकासाची अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार