Home / Uncategorized / छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त; शिवना येथे ३९ लिटर अवैध मद्य जप्त — एकास अटक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त; शिवना येथे ३९ लिटर अवैध मद्य जप्त — एकास अटक

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर उत्पादक शुल्क विभागाने धडक कारवाई करत हा अवैध व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे. दि. ९ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या या धाडीत सुमारे २३ हजार रुपये किमतीचे ३९ लिटर बनावट मद्य व मद्यनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले असून राजेंद्र मोकासे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्पादक शुल्क सिल्लोड विभागाला शिवना परिसरात मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने शिवना येथील हॉटेल फौजी येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे सुरू असलेला अवैध दारू बनविण्याचा कारखाना उघडकीस आला. घटनास्थळावरून तयार बनावट मद्य, केमिकल्स, रिकाम्या बाटल्या तसेच इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.

दरम्यान, दारूचे वाढलेले दर लक्षात घेता अजिंठा लेणी व शिवना परिसरात बनावट दारू विक्रीचे जाळे पसरण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक मद्यप्रेमी व नागरिकांकडून उत्पादक शुल्क विभागाने आणखी कडक व सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा येथील सपोनि अमोल ढाकणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार