Home / Uncategorized / गुरुजींना सकाळच्या शाळेचा विसर ; गोद्रीवाडी येथील शिक्षकांचा प्रताप; स्थानिकांमध्ये संताप…!

गुरुजींना सकाळच्या शाळेचा विसर ; गोद्रीवाडी येथील शिक्षकांचा प्रताप; स्थानिकांमध्ये संताप…!

चिखली :- प्रशांत जैवाळ

गोद्रीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळच्या सत्रात शिकवणी घेण्याऐवजी संबंधित शिक्षकांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नियमित वेळेत शाळा न उघडल्याने व विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत ठेवण्यात आल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची सकाळची वेळ ठरलेली असताना देखील शिक्षक ठरावीक वेळी उपस्थित राहिले नाहीत. गोद्रीवाडी या गावात दोन शिक्षक असलेल्या या शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या एका व्हाट्सएप ग्रुपवर स्वतः संदेश टाकून दिनांक ५ व ६ रोजी क्रीडा परीक्षा असल्याने सकाळची शाळा ठेवण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत हजर राहावे असे सांगण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात आज सकाळी साडेसात वाजेपासून विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसलेले होते. शाळेला कुलूप होते आणि एकही शिक्षक उपस्थित नव्हता. सकाळी सात वाजता विद्यार्थी शाळेत हजर झाले असतानाही सकाळी दहा वाजेपर्यंत शाळा बंदच होती. त्यामुळे विद्यार्थी तीन तासांहून अधिक काळ शाळेबाहेर थांबले होते. ही बाब लक्षात येताच पत्रकार टीम त्या ठिकाणी पोहोचली ,शाळा डोंगराळ व शेत परिसरात असल्याने सकाळी साडेसात ते दहा या वेळेत लहान विद्यार्थी एकटेच बाहेर बसलेले होते, ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात विचारणा केली असता केंद्रप्रमुख केवट यांनी दूरध्वनीद्वारे “काही शाळा सकाळी तर काही दुपारी सुरू आहेत. संबंधित शाळा कधी सुरू आहे याची मला माहिती नाही,” असे उत्तर दिले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांच्या सुट्टीचा कोणताही अधिकृत अर्ज किंवा माहिती केंद्रप्रमुखांकडे उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले.संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश शाळा सकाळच्या सत्रात सुरू असताना गोद्रीवाडी येथील शाळेत शिक्षक वेळेवर हजर नसणे, शाळा बंद असणे, वेळेचा कुठलाही स्पष्टपणा नसणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती नसणे यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ व अनागोंदी कारभार उघड झाला आहे.

या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी तसेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ होणार नाही याची खात्री करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे,यावेळी पालकांनी शाळेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षणासारख्या संवेदनशील विषयाकडे होणारे हे दुर्लक्ष गंभीर असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे तसेच शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गोद्रीवाडी परिसरात शिक्षण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार