Home / Uncategorized / फर्दापूर गणातील बौध्द समाजाने आमदार अब्दुल सत्तार यांच्या पक्षाच्या उमेदवार यांना मतदान का करू नये पत्रकार प्रविण तायडे यांचे मत आमदार अब्दुल सत्तार यांचेच पारडे जड

फर्दापूर गणातील बौध्द समाजाने आमदार अब्दुल सत्तार यांच्या पक्षाच्या उमेदवार यांना मतदान का करू नये पत्रकार प्रविण तायडे यांचे मत आमदार अब्दुल सत्तार यांचेच पारडे जड

 

छत्रपती संभाजी नगर : गोकुळ सिंग राजपूत

 

 

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाचा प्रचार, वारे जोरदार वाहत असून मतदानाला अवघे ४ दिवस उरले असून बौध्द समाजाला आवर्जून सांगणे आहे कि आमदार अब्दुल सत्तार यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांना यांना मतदान का देऊ नये आपल्या समोर काही सत्यता असणारे मुद्दे निदर्शनास आणून देत आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी कधीही जाती पातीचे राजकारण केले नाही. सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या उमेदवार यांनी श्री तीर्थक्षेत्र मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. मात्र भाजपा उमेदवार यांनी फर्दापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार नं टाकता साधे अभिवादन केले नाही. मत मागण्यासाठी फक्त बौध्द आठवतात का?अशा उमेदवार यांना बौध्द समाजाने मतदान का करावे हा प्रश्न उपस्थित होतो.धम्मालचल येथील कार्तिक पौर्णिमा धम्मपरिषद कार्यक्रमात भाजपा चे माजी खासदार रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री असताना सुद्धा आलेले नाही. अल्पसंख्यांक नेते ईद्रीस मुलतानी यांनी सुद्धा एकही वेळेस साधी भेट दिलेली नाही. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर येथील प्रवेश द्वाराला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले, हे नाव, कधीही न मिटनारे इतिहासात नोंद झाली आहे.याचे संपूर्ण श्रेय आमदार अब्दुल सत्तार यांच्या पक्षांच्या एकहाती सत्ता असलेल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उपसरपंच यांच्या एकमातने, ठराव घेऊन महान कार्य केले आहे. फर्दापूर येथिल बौद्ध समाजाची , स्मशानभूमीत संरक्षण भिंतींचे काम व सुशोभीकरण करण्यात आले. फर्दापूर येथिल, धम्माचल येथे, बौध्द उपासक, उपासिका, धम्मगुरु भंतेजी यांच्या साठी २ दोन कोटी रुपयांचे यात्रि निवास बांधले आहे. फर्दापूर येथिल टि पॉईंट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ‌भिम,पार्क यांचे प्रगती पथावर आहे. हे स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जन्मापासून ते महापरीनिर्वाण पर्यंत इतिहास दाखवणारी कलाकृती साकारणार आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून बौद्ध समाजाला खूप काही देण्याचं काम करण्यात आलेल आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीम पार्क जे की त्याचे काम आज रोजी प्रगतीपथावर सुरु असून आमदार अब्दुल सत्तार यांना ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.तसेच फर्दापूर धम्माचल येथे २ दोन कोटीचे यात्री निवास बांधकाम देखील प्रगती पथावर आहे. त्याच प्रमाणे फर्दापूर गावांमधील बौद्ध बांधवांच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत व सुशोभीकरणाचे काम झालेले आहे. जळगाव /संभाजीनगर (औरंगाबाद) महामार्गाला लागून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बनविण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेवर सभा मंडपाचे काम लवकरच सुरू होणार असून यासाठी आपण आपलं ऋण फेडण्यासाठी अब्दुल सत्तार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आज रोजी गरजेचे आहे. आपण डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी या परिसरात आपल्या बौध्द समाजासाठी विविध विकास काम केल्यामुळे त्यांनी उभे केलेल्या जिल्हा परिषद उमेदवार प्रभावती दारासिंग चव्हाण, पंचायत समिती उमेदवार शेख मुक्तार शेख मुन्शी उमेदवारांना आपले अमूल्य मतदान देऊन आपले कर्तव्य बजावणे ही आपली जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार