Home / Uncategorized / बुलढाणा जिल्ह्याला पहिला तायक्वांदो राष्ट्रीय पंच; ऋषिकेश सुनील सोळंकी यांचे ऐतिहासिक यश…!

बुलढाणा जिल्ह्याला पहिला तायक्वांदो राष्ट्रीय पंच; ऋषिकेश सुनील सोळंकी यांचे ऐतिहासिक यश…!

 

चिखली | मेघा जाधव

बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मानाचा अध्याय लिहित ऋषिकेश सुनील सोळंकी यांनी तायक्वांदो या आंतरराष्ट्रीय खेळात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल रेफरी सेमिनार २०२६ अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा त्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून, ते बुलढाणा जिल्ह्यातील पहिले तायक्वांदो राष्ट्रीय पंच (नॅशनल रेफरी) ठरले आहेत.

हा नॅशनल रेफरी सेमिनार बीड जिल्ह्यात पार पडला. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (TFI) तसेच महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन, मुंबई (TAM) यांच्या मान्यतेने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात क्योरुगी (स्पर्धात्मक लढत) व पुमसे (कौशल्य सादरीकरण) या दोन्ही प्रकारांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले तसेच लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेत यश संपादन करत ऋषिकेश सोळंकी यांनी राष्ट्रीय पंच म्हणून मानांकन प्राप्त केले. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

या यशाबद्दल जिल्ह्यातील खेळाडू, पालक, प्रशिक्षक तसेच क्रीडा प्रेमींनी ऋषिकेश सोळंकी यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाला नवी दिशा व ओळख मिळेल, तसेच भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार