Home / Uncategorized / जळकी बाजार येथे सौ. शोभा सुरडकर यांना उस्फुर्त प्रतिसाद; पानवढोद गणात शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार वेगात

जळकी बाजार येथे सौ. शोभा सुरडकर यांना उस्फुर्त प्रतिसाद; पानवढोद गणात शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार वेगात

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत 

“जनतेचा कौल आमच्याच बाजूने” – जळकी बाजारात सौ. शोभा सुरडकर यांना प्रचंड मतदार पाठिंबा….

 

 जळकी बाजार येथे पानवढोद पंचायत समिती गणाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभा दशरथ सुरडकर यांना मतदारांचा प्रचंड व उस्फुर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उमेदवाराबद्दलचा विश्वास व्यक्त केला आहे.

या परिसरात झालेल्या प्रचार सभांमध्ये महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह विशेषत्वाने दिसून आला. विकासाभिमुख भूमिका, सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संवाद व प्रामाणिक नेतृत्व ही सौ. शोभा सुरडकर यांची ओळख मतदारांना भावली असून त्यामुळेच जनतेचा कल स्पष्टपणे शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

यावेळी बोलताना सोयगाव तालुका शहर प्रमुख दिलीप मचे यांनी सांगितले की, “पानवढोद गणातील मतदारांनी ठामपणे परिवर्तनाचा निर्णय घेतला असून सौ. शोभा सुरडकर यांच्या पाठीशी जनतेची भक्कम साथ आहे. विकास, पारदर्शकता व लोकाभिमुख कामांचा वारसा पुढे नेण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत.”

दरम्यान, प्रचारात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन संवाद साधत पक्षाची भूमिका मांडली. येणाऱ्या निवडणुकीत सौ. शोभा सुरडकर यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जळकी बाजार व परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार