देऊळगाव राजा: मुन्ना ठाकूर
महसूल व पोलीस विभाग संयुक्त कारवाई
आज दिनांक 29 /1 /26 रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील यांचे मार्गदर्शन तथा उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांचे निर्देशाने तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे नेतृत्वाखालील अवैध रेती वाहतूक तथा उत्खनन प्रतिबंध पथक गस्तीवर असताना शीताफी,ने त्यांना सिनगाव जहागीर येथे गट नंबर गट नंबर 341 सीनगाव जहागीर खल्लाळगव्हाण रस्ता खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उत्खनन करणारी एक मोठी फायबर बोट व एक छोटी इंजिन बोट आढळून आली. त्या पथका तील सदस्यांनी बोट पकडून त्यानंतर पथकाने सदर बोट जप्त केली व सुरक्षित ठिकाणी किनाऱ्यालगत आणून नष्ट केली. सदर कार्यवाही करताना बोटीवर असलेले परप्रांतीय मजूर पळून गेले. त्यापैकी एकाचे आधार कार्ड त्या ठिकाणी मिळुन आले. ते पुढील कार्यवाही साठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले . सदर ठिकाणी रेती उपसा करणारे असलेले सर्व साहित्य नष्ट करण्यात आले , तसेच रेतीचा तळ म्हणजे खड्डे उध्वस्त करण्यात आले . रेती वाहतूक होणारे रस्ते तोडण्यात आले .सदर कार्यवाही करताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .सदर कार्यवाही करताना खालील अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. प्रा संजय खडसे साहेब उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा , वैशाली डोंगरजाळ तहसीलदार देऊळगाव राजा, सायली जाधव नायब तहसीलदार, विजय हिरवे मंडळाधिकारी मेहुणा राजा महसूल सहाय्यक उमेश गरकल,प्रशांत वाघ, ग्राम महसूल अधिकारी संजय हांडे, आकाश खरात , सरीता वाघ ,तेजस शेटे, पोलीस कॉन्स्टेबल माधव कुटे , कलीम देशमुख , शिपाई ताठे महसूल सेवक वैशाली देशमाने, मारुती बंगाळे हजर होते.






