Home / Uncategorized / मनोरा येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. रतनलाल बजरंगलाल हेडा यांचे निधन..

मनोरा येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. रतनलाल बजरंगलाल हेडा यांचे निधन..

मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे

मनोरा येथील सुप्रसिद्ध व्यापारी श्री. रतनलाल बजरंगलाल हेडा (वय ८९) यांचे दीर्घ आजाराने आज रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी दुःखद निधन झाले.

  1. मनोरा शहराच्या व्यापारी क्षेत्रात श्री. हेडा यांचे मोठे योगदान होते. प्रामाणिकपणा, साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या जाण्याने मनोरा शहराने एक आदरणीय, अनुभवी आणि ज्येष्ठ व्यापारी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

त्यांच्या पश्चात

पुत्र श्री. संजू शेठ रतनलालजी हेडा,

बंधू श्री. राधेश्यामजी हेडा,

पुतणे श्री. जुगल शेठ हेडा, श्री. गोपाल शेठ हेडा,

तसेच नातू पतू

असा मोठा परिवार असून सर्व कुटुंबीय शोकसागरात आहेत.

या दुःखद घटनेने मनोरा नगरीसह तालुका व जिल्ह्यातील व्यापारी, नागरिक आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातून हेडा कुटुंबीयांवर सांत्वनाचा वर्षाव होत आहे.

स्व. श्री. रतनलाल बजरंगलाल हेडा यांना मनोरा नगरी व तालुक्यातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

॥ ॐ शांती ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार