Home / Uncategorized / श्री व्यंकटेश महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा

 

देऊळगाव राजा प्रतिनिधी : मुन्ना ठाकूर 

 

स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागांतर्गत कार्यरत असलेला निवडणूक साक्षरता क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने

‘राष्ट्रीय मतदार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. महेंद्र साळवे यांनी मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाने कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा समान अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे, असे मत व्यक्त केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असणाऱ्या आपल्या देशात तरुण मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. त्यामुळे युवकांनी कोणत्याही आमिषाला, जात-धर्माच्या प्रलोभनाला किंवा भावनिक भूलथापांना बळी न पडता निर्भयपणे व विवेकबुद्धीने मतदान करून लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. गजानन तांबडे यांनी मार्गदर्शन करताना सशक्त लोकशाहीसाठी सजग मतदार घडणे आवश्यक आहे तसेच महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या या उत्सवात जबाबदार नागरिक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी केले. त्यांनी मतदार दिनाचे महत्त्व पटवून देताना भावी पिढीमध्ये संविधानिक मूल्यांची जोपासना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. निशा मोरे हिने तर उपस्थितांचे आभार कु. वैष्णवी राऊत हिने मानले. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर माने, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती ढोकले, राष्ट्रीय कॅडेट कोर अधिकारी डॉ. महेश तांदळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार