चिखली | मेघा जाधव
स्थानिक : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथील खेळाडू आकाश बारवाल, वैभव बरडे आणि गौरव भराड यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे निवड करण्यात आली आहे. हे तिन्ही खेळाडू दिनांक १५/०२/२०२६ ला महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. प्रमोद आर. पडोळे, आयक्युऐसी समन्वयक, डॉ. वनिता पोच्छी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रा. सचिन कोकोडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण, संचालक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.






