Home / Uncategorized / चिखला येथे घटनेचा निषेध; दोषींवर कडक कारवाईची मागणी,मात्र निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेतली जावी….

चिखला येथे घटनेचा निषेध; दोषींवर कडक कारवाईची मागणी,मात्र निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेतली जावी….

 

चिखला (ता. लोणार) | २२ फेब्रुवारी २०२६

मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलेल्या प्रकारानंतर परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे. संबंधित घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार संजयजी रायमूळकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, शिवसेना नेते बळीराम मापारी,शिवसेना नेत्या अनुजा सावळे पाटील तसेच शिवसेना नेते अनमोल ढोरे पाटील,गजानन म्हस्के यांनी चिखला गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, “ही घटना अत्यंत निषेधार्ह असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. मात्र कारवाई करताना निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेतली जावी.”

त्यांनी पुढे सांगितले की, गावातील सामाजिक सलोखा अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व समाजातील नागरिकांनी संयम राखत शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना नेत्या अनुजा सावळे पाटील आणि अनमोल ढोरे पाटील यांनीही ग्रामस्थांची भेट घेत घटनेचा निषेध नोंदवला. “समाजात विभागणी करणाऱ्या प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांचीही भूमिका आहे. पोलिस प्रशासनाशी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गावातील सर्व समाजातील नागरिकांनी शांतता आणि ऐक्य टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार