Home / Uncategorized / मानोरा येथे गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

मानोरा येथे गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

 

मानोरा (वाशिम प्रतिनिधी : सुधीर ढगे) 

मनोरा शहरातील वसंत नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महाप्रसादाचे आयोजन श्री रवीभाऊ देशमुख सर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

गेल्या काही काळापासून प्रत्येक गुरुवारी भाविक भक्तांच्या सहकार्याने येथे महाप्रसादाचे नियमित आयोजन केले जाते. या महाप्रसादासाठी परिसरातील तसेच दूरवरून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतात.

महाप्रसादाचे नियोजन श्री रवीभाऊ देशमुख यांनी सुयोग्य पद्धतीने केल्याची माहिती मंदिर संस्थेचे पदाधिकारी श्री रामकृष्ण गावंडे यांनी दिली.

यावेळी मंदिराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार