बुलडाणा:उमा जैवाळ
रस्ते, पाट, महसूल च्या अनेक सोयीसुविधांपासून वंचीत असलेल्या ‘काळोणावाडी’ गावचे नागरी आक्रमक पवित्र्यात
समस्या मार्गी न लागल्यास 9 फेब्रुवारी 2026 रोजी आमरण उपोषण तथा मतदानावर बहीष्कार टाकण्याचा इशारा..
चिखली/(लोकमहाराष्ट्र न्यूज):- तालुक्यातील काळोनावाडी येथील नागरिकांनी गावातील विविध समस्या बाबत तालुका दंडाधिकारी यांच्या मार्फत महसुल मंत्र्यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की,19 व्या शतकाच्या अगोदर पासून वसलेल्या भरोसा भाग एक मधील काळोनावाडी चे अस्तित्व देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पार आली तरी कुठेच दिसत नाही. देश एकीकडे महासत्ता होण्याचे मार्गावर असताना अजून महसूल दप्तरी स्वतःचे नाव तर नाहीच शिवाय मायांमध्ये गेल्या अनेक दशकपासून अनेक समस्या कायम आहेत त्यामध्ये प्रमुख समस्या म्हणजे गावात दळण वळणासाठी अनेक वर्ष रस्ताच नव्हता काही वर्षांपूर्वी माती चा रास्ता जिल्हा परिषद च्या माध्यमातून केल्या गेला परंतु पुन्हा या कडे कोणीही येऊन पाहिले नाही आणि अनेक वर्षापासुन हा रस्ता निस्तनाबूत झाला परिणामी आजरोजी सदर रस्त्यावरून साधे पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. अडीच तीन किलोमीटर पर्यंत जीवघेणा प्रवास करावा लागतो. . अशी बीकट अवस्था असताना प्रशासन याकडे अनेकदा मागणी करूनही लक्ष देत नाही.
याशिवाय अनेक समस्या जसे की काळोना गावाचे नाव नकाशावर नाही ,तसेच पाटबंधारे विभागाने आजूबाजूच्या सर्व गावांना पाटाची व्यवस्था केली पोच पाणी दिले परन्तु काळोना गावच्या शेतक-यांना मात्र पाण्यापासून पाटबंधारे विभागाने वंचित ठेवले,गावकऱ्यांचे अस्तित्व महसूलच्या नकाशावर नाही तरी या देशाच्या नकाशावरूनच काढण्याचा व येणाऱ्या काळात सर्व सुविधा पासून दूर ठेवण्याचा एकूणच प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहे का?असा आरोप ही सदर निवेदनात करण्यात आला आहे. यामुळेच गावातील अनेक लोक इतर ठिकाणी स्थलांतर होत आहे. पाटबंधारे विभागाने गावाला पाटा पासून वंचित ठेवते त्या पाटबंधारे विभागाने व्यवस्था करून देऊन खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी आमच्या शेताला द्यावे , काचे आमच्या नावाला विशेष म्हणजे स्मशानभूमी नाही, विशेष म्हणजे आमच्या गावचे नाव स्वतंत्र अस्तित्व अर्थात आमच्याकडून काळोना गावाने महसूल पटलावर वेण्यात यावे या सर्व समस्या आपण तातडीने सोडवाव्या या मागण्याकडे गांभीर्यपूर्वका लक्ष देऊन आम्हाला न्याय व दिल्यास आम्ही येणाऱ्या वीस दिवसानंतर अर्थात देणाऱ्या 9 केब्रुवारी 2026 रोजी काळोबा पाटीजवळ सर्व ग्रामस्थ महिला मंडळी सह आमरण उपोषणास बसणार असुन शिवाव येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या मतदानावर आमचा स्पष्टपणे बहिष्कार असेल,आम्ही कुठेही मतदानाता जाणार नाही होणाऱ्या विपरित परिणामास आपण व आपले प्रशासन जबाबदार रहाल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.






