Home / Uncategorized / उबाठा शिवसेनेसह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

उबाठा शिवसेनेसह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

 

 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, सुरेश बनकर पाटील व ईद्रीस मुलतानी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसैनिकांची मोठी गर्दी

सोयगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

 

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील व सोयगाव तालुक्यातील दि .१९/१/२६ रोजी मा. केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. रावसाहेब दादा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयगाव तालुक्यात ऐतिहासिक राजकीय घडामोड घडली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य तसेच सामाजिक कार्यातील युवा नेतृत्वाने भाजपामध्ये जाहीर प्रवेश करत पक्षाला मोठे बळ दिले.

भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेशजी बनकर पाटील, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी BOSS, माजी नगरसेवक सुनीलभाऊ मिरकर, VJNT प्रदेशाध्यक्ष सेल जयप्रकाश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुडाळ, माजी सभापती उत्तम चव्हाण, सोयगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, युवा तालुकाध्यक्ष प्रदीप चव्हाण, माजी उपसरपंच अण्णा पाटील, माजी सरपंच त्र्यंबक शिंगारे, माजी सरपंच आज्ञा सिंग राठोड, माजी सरपंच प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, माजी सरपंच मोहनसिंग चव्हाण, शिवसेना युवा नेते करतारसिंग चव्हाण, वरखेडी खुर्द येथील विद्यमान सरपंच बळीरामजी जाधव, जामठी माजी सरपंच सिताराम जाधव, उपसरपंच उत्तम राठोड, जामठी सोसायटी उपाध्यक्ष हेमराज राठोड, विजय राठोड, ग्रामपंचायत सदस्य श्रावण राठोड, बृहान तडवी, प्रदीप चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख ताराचंद जाधव, गुलाब चव्हाण तसेच फरदापुर गटातील असंख्य शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष श्री ईद्रीसजी मुलतानी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी “भाजपाची विकासाची विचारधारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास वाढत असून भाजपाच राज्य व देशाचा विकास साधू शकतो,” असे प्रतिपादन केले.

प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे सोयगाव तालुक्यात भाजपाची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रा. जीवन कोलते पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार