Home / Uncategorized / माहेरहून पैसे आणण्याच्या तगाद्यात विवाहितेचा छळ :

माहेरहून पैसे आणण्याच्या तगाद्यात विवाहितेचा छळ :

 

 

मानसिक-शारीरिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या व उपाशी ठेवण्याचा आरोप

फर्दापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद

ब्युरो चीफ प्रशांत जैवाळ 

 

पाचोरा तालुक्यातील शिवणी येथील ह मु राजनगाव, छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात फर्दापूर ता सोयगाव येथे सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहित महिलेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी योगिता प्रमोद पाटील (वय २७, व्यवसाय गृहिणी, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रांजनगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, त्यांचे लग्न दि. १ मे २०१४ रोजी हिंदू धर्माप्रमाणे सावळदबारा येथे प्रमोद भरतसिंग पाटील यांच्याशी झाले. लग्नावेळी माहेरकडून संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, भांडी, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळे सोन्याची चैन तसेच हुंड्यापोटी २ लाख रुपये रोख देण्यात आले होते.

लग्नानंतर सुरुवातीचा एक वर्षाचा कालावधी सुरळीत गेल्यानंतर पती, सासू-सासरे, जेठ तसेच नणंद व नणंदेई यांनी संगनमताने माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “तू उलट्या पायाची आहेस, तुझ्यामुळे घरात पैसा टिकत नाही,” अशा शब्दांत अपमान करून जीवे मारण्याच्या व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच, पती दारूच्या नशेत शिवीगाळ करीत मारहाण करीत असल्याचे, चारित्र्यावर संशय घेत मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सासरच्या घराच्या वरच्या मजल्याच्या बांधकामासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी दोन लाख रुपये दिले असतानाही छळ थांबवण्यात आला नाही, असेही जबाबात स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी पती प्रमोद भरतसिंग पाटील, सासरे भरतसिंग हिलाल पाटील, सासू सिंधुताई भरतसिंग पाटील, जेठ गणेश भरतसिंग पाटील (सर्व रा. स्वामी समर्थ कॉलनी, रांजनगाव, ता. गंगापूर) तसेच नणंदेई समाधान पवार व नणंद पुष्पाताई समाधान पवार (रा. दहीगाव पिंपरी, ता. ऐरंडोल, जि. जळगाव) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 85, 115(2), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्याकडे नोंदवण्यात आला असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार निलेश लोखंडे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार