Home / Uncategorized / मकरसंक्रांतीनिमित्त दिंडोरी तहसील व पोलीस प्रशासनात सामाजिक सलोख्याचा संदेश; दत्तात्रेय गोसावी यांच्याकडून तिळगुळ वाटप

मकरसंक्रांतीनिमित्त दिंडोरी तहसील व पोलीस प्रशासनात सामाजिक सलोख्याचा संदेश; दत्तात्रेय गोसावी यांच्याकडून तिळगुळ वाटप

 

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: गोकुळसिंग राजपूत 

 

दिंडोरी तालुक्यात मकरसंक्रांती सणाचे औचित्य साधून सामाजिक सलोखा व आपुलकीचा संदेश देण्यात आला. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, दिंडोरी व पोलीस स्टेशन दिंडोरी (नाशिक ग्रामीण) येथे दि. १६ जानेवारी २०२६ रोजी श्री. दत्तात्रेय रामचंद्र गोसावी (सामाजिक कार्यकर्ते, बारागाव पिंपरी) यांच्या हस्ते तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार डॉ. चैताली दराडे मॅडम तसेच पोलीस स्टेशन दिंडोरी येथील पोलीस अधिकारी श्री. प्रदीप शिंदे साहेब यांना श्री. दत्तात्रेय गोसावी यांनी तिळगुळ देत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून समाजात सौहार्द, एकोपा व सद्भावना वृद्धिंगत व्हावी, हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच वणी पोलीस ठाण्यातही मकरसंक्रांतीनिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव मॅडम यांना श्री. दत्तात्रेय गोसावी यांनी तिळगुळाचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासन व समाज यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच सणाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली जावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

मकरसंक्रांतीसारख्या पारंपरिक सणाच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस यंत्रणा व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात सुसंवाद व सहकार्याचा आदर्श निर्माण झाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार