चिखली :- चिखली नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये वाढता असंतोष आता उघडपणे समोर आला आहे. भाजपमधील अनेक प्रभावी, अनुभवी व कार्यकर्त्यांच्या गटाने पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करून चिखली तालुक्यातील राजकीय चित्र पालटण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे येणाऱ्या निवडणुकांची चुरस अधिक तीव्र होणार हे निश्चित.
काल झालेल्या भव्य कार्यक्रमात माजी नगरसेवक तथा भाजप नेते निलेश अंजनकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य विष्णू मेथे ,संचालक – चिखली किराणा व्यापारी असोसिएशन, माजी नगरसेवक हेमंत खेडेकर, सामाजिक चळवळीतील डॅशिंग व्यक्तिमत्व भाई छोटू कांबळे, पंडा जेठे, निलेश रक्ताडे,राका मेहेत्रे, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या सर्वांनी केंद्रीय आयुष मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापरावजी जाधव, धर्मवीर श्री संजू भाऊ गायकवाड युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेची धुरा हाती घेतली. कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई म्हस्के,जिल्हा नियोजन समिती सदस्य कैलास भालेकर उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, जेष्ठ नेते भास्करराव राऊत, जेष्ठ नेते पुरुषोत्तम वायाळ,तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, कपिल खेडेकर, ज्येष्ठ नेते नरेश राजपूत, युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी शिराळे, विठ्ठल जगदाळे अनमोल ढोरे पाटील, डीपी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा, यांची उपस्थिती होती.
या प्रवेशामुळे शिवसेनेने चिखली शहरात आपली ताकद दुपटीने वाढल्याचा दावा केलेला असताना, भाजपच्या स्थानिक संघटनात मात्र चिंतेचे सावट दाटले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राजकीय गणिते मोठ्या वेगाने बदलणार असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत.






