देऊळगाव राजा:-(लोक महाराष्ट्र न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प. गटाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नरेश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आणि देऊळगाव राजा तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी यांनी यानिमित्त शुभेच्छा बॅनर लावले असता, लावण्यात आलेल्या बॅनरवर मध्ये राष्ट्रवादी नेते डॉ रामप्रसाद शेळके यांचा फोटो न लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर स्व पक्षीय व इतर पक्षातील लोकांकडून ही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत असून, अनेक कार्यकर्त्यांनी पोस्टद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पक्षातील वरिष्ठ आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या नेत्याचा अपमान हेतुपुरस्सर करण्यात आला आहे. काहींनी याला गटबाजीचे घोतक म्हटले असून, काहींनी म्हटले आहे की,
“गरज सरो वैद्य मरो अशी जी एक म्हण आहे आपल्याकडे ती तंतोतंत लागू होते. कालचे चिल्लर लोकं एखाद्या सन्माननीय कार्यकर्त्याचा फोटो न टाकता, म्हणजे स्वतःश्रेष्ठ करण्यात दुर्दैव वाटत. रामप्रसाद शेळके संपूर्ण महाराष्ट्रात बॅनर लावू शकतो तुम्ही काय त्याचा फोटो टाकत नाही,”
तर एक प्रतिक्रिया अशी आहे की,“डॉक्टर शेळके एकतर्फी प्रेमात पडलेली व्यक्ती आहे , त्यांचा योग्य वेळी वापर कसा करुण घ्यावा लागतो काही मंडळींना माहीत आहे, डॉक्टर शेळके विश्वास ठेवणारे आहे , बॅनर हा त्यांचे साठी चिल्लर विषय आहे…”
कार्यकर्त्यांनो लाजा वाटू द्या रे :
विधानसभेच्या निवडणुकीत डॉ रामप्रसाद शेळके साहेब सोबत होते म्हणून निसटता पराभव झाला आणि नरेश शेळके च्या अभिनंदन बॅनरवर त्याच माणसांचा फोटो टाकायला लाजा वाटत्यावाटतात का.? असा संतप्त सवाल केला आहे. अश्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहे. घडत असलेल्या या घटनेमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटनात असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत पक्षातील पदाधिकारी यांनी कोणतेही औपचारिक वक्तव्य अथवा प्रतिक्रिया दिली नाही.






