Home / Uncategorized / कामावर प्रेम असेल तरच प्रगती आणि यश मिळते — प्रा. सौ. अनुजा सावळे…

कामावर प्रेम असेल तरच प्रगती आणि यश मिळते — प्रा. सौ. अनुजा सावळे…

 लोक महाराष्ट्र न्यूज उमा जैवाळ 

📍 भादोला, ता. बुलडाणा | दि. 18 सप्टेंबर 2026

राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन, बुलडाणाच्या अध्यक्ष प्रा. सौ. अनुजा सावळे यांनी भादोला येथील सहकारी कर्मचारी श्री. स्वप्नील तोतरे यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायांचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.

यावेळी श्री. स्वप्नील तोतरे यांनी पथसंस्थेच्या दैनंदिन कामकाजाचा हुबेहूब देखावा साकारला होता. हा देखावा पाहून प्रा. सौ. अनुजा सावळे यांनी स्वप्नील तोतरे यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले.

“आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राबद्दल प्रेम आणि आपुलकी असली पाहिजे. त्यातूनच प्रगती आणि यश मिळते,” असा आपला अनुभव त्यांनी यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधताना व्यक्त केला.

यावेळी पथसंस्थेचे कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रा. सौ. अनुजा सावळे

अध्यक्ष — राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन, बुलडाणा

जिल्हा समन्वयक — शिवसेना महिला आघाडी, जिल्हा बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार