Home / Uncategorized / वर्धापनदिनाला समाजसेवेची झालर देणाऱ्या विचारधारेला आमचा मानाचा सलाम – नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत….

वर्धापनदिनाला समाजसेवेची झालर देणाऱ्या विचारधारेला आमचा मानाचा सलाम – नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत….

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संगमनेर या शाखेच्या 34 व्या वर्धापनदिनाप्रसंगी नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी काढले गौरवोद्गार. यावेळी श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन मा. सुधाकर जोशी हे देखील प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते, सोबत सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खैरनार, उद्योजक विशाल बाळासाहेब भागवत यांच्यासह विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंसथेचे चेअरमन संपत दत्तात्रय सूर्यवंशी, माजी चेअरमन देविदास मुरलीधर गोरे, व्हाईस चेअरमन विजय किसन सूर्यवंशी, माजी चेअरमन महेश सूर्यवंशी, व्हाईस चेअरमन सविता अरविंद वाकचौरे, संचालक अशोक भास्कर वाकचौरे, राजेश वाकचौरे, दत्तात्रय राऊत, एडवोकेट राजू खरे, कैलास क्षीरसागर, सुखदेव इल्हे, कल्पना कदम, बबन कदम, महेश जानवीकर, बाजीराव वाकचौरे, नामदेव गाडेकर, विलास सूर्यवंशी, प्रवीण रोकडे, श्रीकांत सोनवणे, व्यवस्थापक अरुण उदमले, उप व्यवस्थापक अनिल पवार कर्ज अधिकारी राजेंद्र गुंजाळ, खजांजी सुवर्णा बागल आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्वकर्मा समाजबांधव व रहिवासी सदर कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते…प्रखर, अभ्यासू वक्ते अमोलभाऊ भागवत यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील हजेरी लावली, विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मा. अमोलभाऊ भागवत यांनी आपले वडील कै. बाळासाहेब निवृत्ती भागवत यांच्या स्मरणार्थ इ.10,12 मधील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचीही घोषणा केली. त्यानंतर भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन यांनी देखील त्यांच्या शैलीत समस्त समूहाचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमावेळी इयत्ता पहिली ते उच्च माध्यमिक वर्गापर्यंत यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले व विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत अभिनंदन करून सन्मानित केले गेले. विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करून त्यांना उज्वल भविष्यासाठी प्रेरित करण्यात आले.

चहापानानंतर सदर पतसंस्थेच्या वार्षिक अहवाल सादर करून, सर्वसाधारण सभेची सुरवात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार