Home / Uncategorized / पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी अटक…

पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी अटक…

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

आकाश गुजर याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत; सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल जप्त;सपोनि प्रवीण दात्रे यांची कारवाई 

पहूर, ता. जामनेर : जळगाव जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पहूर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले सिंघम सपोनि प्रवीण दात्रे पहूर स्टेशन यांनी धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याने पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

पहूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सपोनि प्रवीण दात्रे व पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश सुभाष गुजर (वय २८, रा. नाचणखेडा, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीची प्राथमिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीच्या ताब्यातून हिरो फॅशन प्रो आणि हिरो स्प्लेंडर या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या दोन्ही दुचाकींची अंदाजे एकूण किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जाळ्यात

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पहूर पोलिसांनी विविध माहितीच्या आधारे तपासाची सपोनि प्रवीण दात्रे यांनी चक्रे फिरवली. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या दोन दुचाकींचा तपास लागला. त्यामुळे आणखी काही चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलिस निरीक्षक प्रवीण दात्रे, पोलिस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, तसेच पोलिस कर्मचारी सचिन चौधरी, राहुल पाटील, दीपक पाटील, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, विकास गायकवाड आणि चालक पोलिस हेमंत सोनवणे यांनी सहभाग घेतला.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील करीत आहेत.

पहूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चोरीच्या दुचाकींचा शोध घेऊन त्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीनेही पुढील तपास महत्त्वाचा ठरणार असल्याचे सपोनि प्रवीण दात्रे यांनी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार