छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
चिखली :- भोकर येथे कायम विना अनुदान तत्वावर सुरु असलेल्या मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्या सेवे करीता जाधव परिवारा ने किराणा भेट देऊन आईला जयंती दिनी केले अभिवादन.
सामाजिक, धार्मिक विविध सामाजिक उपक्रमात कार्य करीत दानशूर म्हणून ओळख असलेले महात्मा फुले महामंडळ चे माजी जिल्हा व्यवस्थापक शरद जाधव यांच्या पत्नी विमल शरद जाधव यांचे काही दिवसापूर्वी अस्मिक निधन झाले. बुद्ध धम्मा मध्ये दान परिमिता ला खूप महत्वाचे समजले जाते आणि वर्षावास मध्ये दान दिल्याने पुण्य संपादन होते. त्याचाच एकदा भाग म्हणून जाधव परिवाराने निराधार वृद्धाची सेवा व्हावी या हेतूने आपल्या आईच्या ६८ व्या जयंती निमित्त भोकर येथे कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेले मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्या सेवेकरिता किराणा भेट दिला.
तर इतर ठिकाणी दान केल्यापेक्षा निराधार लोकांच्या सेवेकरिता दान करावे मग ते आर्थिक, साहित्य, वस्तू किंवा कोणत्याही स्वरूपात असावे मात्र दान करावे असे आवाहन शरद जाधव यांनी केले.
तसेच कोठेही निराधार वृद्ध आजी आजोबा आढळून आल्यास त्यांना हीन वागणूक न देता ८८५५८५०३७८ किंवा ९६८९३३१८५३ या नंबर वर संपर्क करावा असे आव्हान तुकाराम आश्रय वृद्धाश्रमा चे संचालक यांनी केले.
यावेळी महात्मा फुले महामंडळ चे माजी जिल्हा व्यवस्थापक शरद जाधव, सौं.माधुरी सुधीर डोंगरदिवे, सौं. सारिका राहुल खरात, सुमित शरद जाधव, ऍड.सुहानी सुधीर डोंगरदिवे, ऍड, शिवानी सुधीर डोंगरदिवे आणि रुद्र राहुल खरात, संचालिका रुपाली डोंगरदिवे यांची उपस्थिती होती.






