Home / Uncategorized / श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी दामोदर राजपूत, खान्देश प्रवक्तापदी भास्कर पाटील…

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी दामोदर राजपूत, खान्देश प्रवक्तापदी भास्कर पाटील…

 जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

राजपूत समाजाच्या संघटन व सक्षमीकरणासाठी नवी जबाबदारी; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

 

भुसावळ, ता. भुसावळ 

राजपूत समाजाच्या संघटन, सक्षमीकरण आणि समाजहिताच्या कार्यासाठी कार्यरत असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्षपदी दामोदर राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भालोद येथील शिक्षक भास्कर नामदेव पाटील यांची खान्देश प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे राजपूत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती सनातन रत्न परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला भाभीसा सुखदेवसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटन महामंत्री योगेंद्रसिंहजी कट्यार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराजसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंहजी ठोके आणि महामंत्री सूरजसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

दामोदर राजपूत यांनी समाजकार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावरून महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तर शिक्षक भास्कर नामदेव पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर खान्देश प्रवक्त्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना दामोदर राजपूत आणि भास्कर नामदेव पाटील यांनी राजपूत समाजाचे संघटन अधिक बळकट करणे, समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि समाजहितासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणे हेच आपले प्रमुख ध्येय राहील, असे सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी करणी सेनेचे सहप्रवक्ते राजेंद्रसिंह पाटील, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हाध्यक्ष संदीप राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिका पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंह राजपूत, शहराध्यक्ष गोकुळ राजपूत, जिल्हा सचिव पंकज चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मीना राजपूत, कविता राजपूत, जयश्री राजपूत, प्रतीक्षा पाटील, विनोद पवार छत्रपती संभाजीनगर, मोहनसिंग पवार पाटील चाळीसगाव,लता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार