छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : श्रीपत पवार
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संचालित माणुसकी वृद्ध सेवालय, जटवाडा रोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माणुसकी समूहाच्या वतीने वृद्धाश्रमाच्या संचालिका पूजा पंडित यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुमित पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास सुमित पंडित, केशव धसाळ, विजय निबाळकर, राम पंडित, पूजा पंडित, लक्ष्मी पंडित तसेच माणुसकी वृद्ध सेवालयातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






