Home / Uncategorized / सावळदबारा परिसरातील मतदारांनी SIR प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी; तालुका संघटक विनोद कोते यांचे आवाहन..!

सावळदबारा परिसरातील मतदारांनी SIR प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी; तालुका संघटक विनोद कोते यांचे आवाहन..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

सोयगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सोयगाव तालुक्यातील तसेच सावळदबारा परिसरातील सर्व पात्र मतदारांनी विलंब न करता आपली एसआयआर प्रक्रिया प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका यांच्या कडे पूर्ण करावी, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सोयगाव तालुका संघटक विनोद कोते यांनी केले आहे.

लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप एसआयआर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्र, बूथस्तरीय अधिकारी (BLO) किंवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

सावळदबारा परिसरातील अनेक नागरिकांनी अद्याप नोंदणी केलेली नसल्याची माहिती समोर येत असून, अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करावा, असेही कोते यांनी स्पष्ट केले. चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा विलंब यामुळे मतदार यादीतील नावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मतदाराने स्वतःची नोंदणी तपासून आवश्यक असल्यास दुरुस्तीची प्रक्रिया देखील पूर्ण करावी, असे त्यांनी नमूद केले.

मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, तो अबाधित राखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने एसआयआर मोहिमेत सहभागी व्हावे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या मतदारांनीही या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन विनोद कोते यांनी केले.

सावळदबारा व परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत निवडणूक यंत्रणेकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि वेळेत एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असेही कोते यांनी शेवटी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार