Home / Uncategorized / सुरक्षित जामनेर” अभियानाला गती; भाडेकरू व कामगारांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक – वरिष्ठ अधिकारी सपोनि कासार…

सुरक्षित जामनेर” अभियानाला गती; भाडेकरू व कामगारांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक – वरिष्ठ अधिकारी सपोनि कासार…

छत्रपती संभाजीनगर | गोकुळसिंग राजपूत

भाडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य; माहिती न दिल्यास घरमालक, सोसायटी पदाधिकारी व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा

सोयगाव तालुक्यातील जामनेर व परिसरात बाहेरून रोजगार, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जामनेर पोलीस ठाण्याच्या वतीने “सुरक्षित जामनेर” अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घरमालक, सोसायटी पदाधिकारी तसेच व्यावसायिकांनी भाडेकरू व कामगारांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक असल्याचे आवाहन वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी केले आहे.

पोलीस निरीक्षक कासार यांनी सांगितले की, अनेक घरमालक भाडेकरू ठेवताना त्यांचे ओळखपत्र, कायमस्वरूपी पत्ता, आधारकार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत. तसेच संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात नसल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक घरमालकाने भाडेकरूची संपूर्ण माहिती जामनेर पोलीस ठाण्यात सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र रेंट अॅक्ट १९९९ मधील कलम २४ नुसार प्रत्येक घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात देणे कायद्याने बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या घरमालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

याशिवाय हॉटेल, बेकरी, वर्कशॉप तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांच्या मालकांनी आपल्या येथे काम करणाऱ्या सर्व कामगार, कारागीर व कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही भाडेकरूला पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याशिवाय सोसायटीमध्ये राहण्यास परवानगी देऊ नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवरही प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल व त्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील, असेही पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन पद्धतीने भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन केले असल्यास त्याची प्रत संबंधित घरमालकाने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र रेंट अॅक्ट १९९९ नुसार अवाजवी डिपॉझिट घेण्यास कायदेशीर मान्यता नसल्याची बाबही पोलिसांनी नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

कायद्याचे पालन करून भाडेकरू व कामगारांची माहिती वेळेत पोलीस प्रशासनाकडे सादर करावी, सुरक्षित व गुन्हेमुक्त जामनेर घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार