Home / Uncategorized / महिलांच्या सुरक्षेसाठी देऊळगाव राजा पोलिसांचे ‘दामिनी पथक’ कार्यान्वित…!

महिलांच्या सुरक्षेसाठी देऊळगाव राजा पोलिसांचे ‘दामिनी पथक’ कार्यान्वित…!

 

देऊळगाव राजा | प्रतिनिधी मुन्ना ठाकूर 

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने ‘दामिनी पथका’ची स्थापना करण्यात आली असून, मंगळवार (दि. १७) रोजी या पथकाच्या कार्याची औपचारिक सुरुवात बसस्थानक चौकातून करण्यात आली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक ब्रह्मगिरी, पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, महिला पोलीस कर्मचारी मीना बिलावेकर, मंगला बीथरे-तायडे तसेच चालक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. अल्पवयीन मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत अनेकांना छेडछाड, अत्याचार व इतर गुन्हेगारी प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

हे पथक शहरातील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ तसेच गर्दीच्या भागांमध्ये नियमित गस्त घालणार असून महिलांशी संबंधित तक्रारींवर तातडीने कारवाई करणार आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दामिनी पथकाच्या स्थापनेमुळे महिलांच्या सुरक्षेला बळ मिळणार असून शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार