Home / Uncategorized / सिंदखेडराजात काही मिनिटे वादळी पावसाची हजेरी; उष्णतेपासून काही काळ दिलासा…

सिंदखेडराजात काही मिनिटे वादळी पावसाची हजेरी; उष्णतेपासून काही काळ दिलासा…

 

सिंदखेडराजा : मुन्ना ठाकूर

शहरात बुधवारी सायंकाळी ४:४५ वाजता अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर १० ते १५ मिनिटे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने उष्णतेने त्रस्त नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला.

वादळी वाऱ्यामुळे शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर एक झाड विद्युत तारेवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी नगर टी-पॉइंट परिसरात अल्पकाळ झालेल्या पावसामुळे रस्त्यावर काही प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र पावसाचा कालावधी कमी असल्याने वाहतूक किंवा जनजीवनावर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.

तालुक्यातील काही भागांत ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्याची नोंद झाली. वृत्त लिहीपर्यंत तालुक्यात अन्यत्र कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद नव्हती.

अचानक झालेल्या या पावसानंतर वातावरणात सुखद गारवा पसरला. कोरड्या धरतीवर पडलेल्या पावसामुळे ओल्या मातीचा सुगंध दरवळला. पावसानंतर हवेत आलेला थंडावा आणि प्रसन्न वातावरणामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार