Home / Uncategorized / घरी बोलावून १५ वर्षीय मुलीवर तरुणाचा दोनदा लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना…

घरी बोलावून १५ वर्षीय मुलीवर तरुणाचा दोनदा लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

छत्रपती संभाजीनगर वाळूज येथे घरी बोलावून १५ वर्षीय मुलीवर तरुणाचा दोनदा लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील साजापूरमध्ये १५ वर्षीय मुलीला घरात बोलावून तरुणाने दोनदा बलात्कार केला. ही घटना दि.२/६/२६ मंगळवारी रात्री समोर आली. मुलीने पालकांसोबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.उमेश (पूर्ण नाव पीडितेला माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलगी साजापूरमध्ये राहते. तिने तक्रारीत म्हटले आहे, की संशयित तरुण व मुलगी एकाच भागात राहतात. उमेशने ७-८ महिन्यांपूर्वी तिच्याशी ओळख केली. त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. साधारणतः पाच महिन्यांपूर्वी तिचे आई-वडील कामावर गेले असताना उमेशने तिला त्याच्या घरी दुपारच्या वेळेस बोलावले.

त्याच्याही घरी कोणी नव्हते. उमेशने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. नंतर तू कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुणाला सांगितले नाही. त्यानंतर पुन्हा २-३ दिवसांनी उमेशने तिला धमकी देऊन घरात बोलावले व पुन्हा जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याने मुलीने पालकांना सांगितले. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती पवार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार