Home / Uncategorized / सावळदबारा परिसरातील गायरान धारक शेतकरी याचा सातबारा प्रश्न अखेर मार्गी…

सावळदबारा परिसरातील गायरान धारक शेतकरी याचा सातबारा प्रश्न अखेर मार्गी…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

लावल्याबद्दल इद्रीस मुलतानी यांचे साखर तुलना स्वागत;

 शिवाजी महाराज चौकातून राज्यमंत्री इद्रिस मुलतानी यांची गावातून भव्य मिरवणूक

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील सुमारे शेतकऱ्यांचा गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित असलेला सातबारा उताऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने साखर तुलना उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

सावळदबारा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्याशी संबंधित प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. त्यामुळे जमीन व्यवहार, कर्जप्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती.

या प्रश्नाची दखल घेत इद्रीस मुलतानी यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांचा सातबारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याने सुमारे ४०० शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

साखर तुलना सत्कार; लाल फेटा बांधून मिरवणूक

सातबारा प्रश्न मार्गी लागल्यानंतर सावळदबारा येथे इद्रीस मुलतानी यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने साखर तुलना सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना लाल फेटा बांधण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराज चौकातून इद्रीस मुलतानी यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आनंद व्यक्त केला.

तब्बल पाच दशकांपासून प्रलंबित असलेला सातबारा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अनेक वर्षांपासून कागदपत्रांच्या अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही शेतकऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती

या वेळी सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल राठोड,जयप्रकाश चव्हाण,गुलाबराव कोलते, गणेश लोखंडे ,नारायण कोलते,प्रमोद पाटील ,कैलास शेळके,प्रभाकर बंडे,मनोज बुढाळ विनोद टिकारे यांच्यासह सावळदबारा परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी इद्रीस मुलतानी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार