छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात दिंडीरी येथील 18 मे रोजीच्या मोर्च्यात थोडे फार कमी जास्त झाले तर मी समजू शकतो,पण गर्दी कमी झाली तर मान्य करता येणार नाही.प्रत्येकाने जबाबदारीने काम करायला पाहीजेत,सर्वांना फोन करा गाड्यांचे नियोजन करा आणी मोर्चा यशस्वी झाला पाहीजे
गेल्या 55 वर्षा पासुन मी सामाजिक कार्यात सक्रिय आहे,1977 साली भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ची स्थापना केली, आगोदर लातूर तालुका, उस्मानाबाद जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्र प्रदेश, आणी 2011 साली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भारतीय स्तरावर संघटनेची बांधणी केली,लाखो कार्यकर्ते निर्माण केले,गल्लीतील, वार्डातील, गावातील कार्यकर्त्यांना तालुका, जिल्हा, विभागीय, प्रदेश, राष्ट्रीय स्तरावर पदे देऊन, त्यांची मोठी प्रतिमा निर्माण केली, संघटना वाढीसाठी शेती विकली प्लाॅट विकले, व्यवसायातील पैसे घालून संघटनेची बांधणी केली, संघटनेच्या बांधणी मुळे माझ्या परिवाशी मला भेटता आले नाही, संघटना हाच माझा परिवार समजुन मी कार्य करीत आलो,आनेक वर्ष जेल, पोलीस केसेस,पोलीसांचा मार खाल्लौ आणी संघटना वाढविली, पुर्ण 55 वर्षाच्या सामाजिक कार्यात कोणाचा चहा न पिता प्रामाणिक पणे कार्य केलेआणी जनतेला न्याय मिळवून दिला,यातुन कार्यकर्ते मोठे करण्याचे काम केले
विधानसभेच्या गॅलरीतुन उडी मारली, आनेक वेळेस पोलीसांनी लाठीचार्ज केला, एकदा माझ्या गाडीवर विज पडली, करोनाच्या काळात माझा स्कोअर 18 चा होता त्यातही मी सुखरूप वाचलो, कारण मला आपल्या सोबत काम करायचे होते
कांही पदाधिकारी फक्त पद घेऊन बसली आहेत, संघटनेनी त्यांना प्रचंड मोठे केले, त्यांची ईमेज बनविली पण ते संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे,ज्यांना संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवायचा नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे, मला नाराजी वाटणार नाही, पण आपण पद घेऊन कार्य करणार नसाल तर मात्र कांही तरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे,तो मी घेणारच आहे,71 वर्ष च्या वयात मी यवढा कार्य करतो आणी आपण गप्प बसता, हे चालणार नाही, आपणास काम करावेच लागेल
दिंडोरी तालुक्यातील भ्रष्ट कारभारविरुद्ध मोर्च्या आहे,आता माझे वय झाले आहे कामाचा प्रचंड मोठा ताण सहन करून सुध्दा संघटनेसाठी मी उपाशी पोटी काम करत आहेत.मात्र ज्यांना संघटनेची जबाबदारी दिली त्यांनी जर त्यांचे काम केले असते तर संघटना अजूनही वाढली असती,आता या मोर्चात मी एक शेवटची संधी देत आहे, मोर्च्या यशस्वी झाला पाहिजे नाहीतर मी निर्णय घेतला आहे आणि 19 मे ला यादी जाहीर पण होणार आहे,आणि जे आले नाही त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या पण होणार आहे त्यामुळे गांभीर्याने विचार करा.
मोर्चा यशस्वी होण्यासाठी मोठया संख्येने हजर व्हा, एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर आयोजकांना सांभाळून घ्या, पण मोर्च्यात संख्या जास्त प्रमाणात कशी येईल त्यासाठी प्रयत्न करा,संजय गवारे बाबा यांचे बायपास झालेले असतांना ते खूप काम करत आहे, जिल्हाध्यक्ष दिपक मंडलीक, गुलाब राव थिटे आणि दिंडोरी येथील तालुका अध्यक्ष प्रवीण गवारे व त्यांची टीम नवखी आहे,त्यांना सांभाळून घ्या.ते खूप काम करत आहेत, बॅनरवर माझा फोटो टाकला नाही,टाकला तर खालीच टाकला,मला मोर्च्यासाठी फोन केला नाही हे प्रकार बंद करा.जे या मोर्च्यात सक्रीय सहभाग घेतील त्यांचा राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्कार देऊन गौरव करणार आहे. आणि जे टाळा-टाळ करतील त्यांची 19 मे यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसे निवड समिती अध्यक्ष अनिल दादा देसले हे जाहीर करणार आहे. काय करायचे सर्वांनी ठरवा.






