Home / Uncategorized / उज्वल यशाची परंपरा कायम” : बारावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

उज्वल यशाची परंपरा कायम” : बारावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

 

छत्रपती संभाजीनगर ब्युरो चीफ गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव तालुक्यातील जय कालिका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा व जय भवानी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मोलखेडा येथील दोन्ही उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल संस्थेचे संस्था अध्यक्ष श्री भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी प्राचार्य नारायण रायभान कोलते व प्राचार्य सुनील त्र्यंबक काकडे यांचे व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे विशेष आभार मानून त्यांचे संस्थेमार्फत पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

संस्थाध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी संस्थेची उज्वल देशाची परंपरा आपण कायम ठेवल्याबद्दल त्यांच्या प्रदीर्घ सेवेला व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सर्व शिक्षक व शिक्षक तर बंधू यांचे विशेष आभार मानून आपण ही परंपरा कायम ठेवावी व विद्यार्थ्यांना व पालकांच्या मनामध्ये आपल्या संस्थे विषयी जो आदर प्रेम कायम ठेवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

सर्व संस्था चालक मंडळांनी सर्व प्राचार्य व शिक्षकांचे विशेष जाहीर सत्कार करून गौरवशाली विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये गुणगौरव सोहळा विजेत करण्यात आला आहे असे सांगून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले . आपल्या संस्था संचलित शाळेच्या निकाल खालील प्रमाणे लागला असे नवनिर्वाचित प्राचार्य जीवन कोलते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावीतील प्रथम तीन विद्यार्थी 12वी वाणिज्य

भाग्यश्री राजेंद्र वाणी 81%

समीर नूरखा तडवी 80%

यश पंकजकुमार जैन 76.33%

12 वी विज्ञान 

1 गौरी सुधीर हरमकर 90.67

2आदेश प्रमोद बोदडे 89.50 

3.समीरसिंग विशालसिंग पाटील 89.17

 12वी कला 

अर्पिता सुधाबाई पातुरकर-85.00

साधना आनंदा माळी-82.83

पूजा प्रकाश मुक्के-80.00

जय भवानी उच्च माध्यमिक विद्यालय मोलखेडा येथील प्रथम तीन विद्यार्थी बारावी विज्ञान

1) प्रथम.-धवल मनोज जयस्वाल -91.33

2) द्वितीय.-सानिका मोहन वाघमारे -88.50

3) तृतीय – पूजा रामचंद्र बरकले -88.17

 बारावी कला 

1) प्रथम – सृष्टी शिवाजी फरपट -80.17

2) द्वितीय – पारूबाई किसन सोनवणे -78.67

3) तृतीय – पुनम गोरख सुरवाडे -78.33

असा शाळेचा निकाल लागला असून यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकाचे आभार मानले त्यामध्ये दिलीप शिसोदे, गणेश मोहने, मनोहर पडोळ, पंजाबराव शेळके प्रवीण कुमार सरकटे जयराम घोति सतीश गवंडे दिलीप कोळी योगेश राठोड, हिरालाल सोनवणे संजय अमृतकर प्रदीप पाटील सुनील कुमार चव्हाण मोहन बोरे दीपक सपाटे अजय रबडे, योगेश शेळके, सतीश खवले, योगेश थोटे श्रीमती पुष्पा टोबरे श्रीमती अनिता घोडके श्रीमती दीपा उगले अनिल सुरडकर विकास पंडित शिवाजी सत्रे राहुल बडक बाबासाहेब कोलते अजबराव चव्हाण श्याम जाधव गजानन चव्हाण संदीप कोलते विकास पाटील विजयसिंह राजपूत सुनील पवार संतोष पाटील विशाल धीरबशी सुभाष राठोड प्रवीण महाले योगेश धनराळे विनोद चव्हाण व प्राचार्य नारायण कोलते व प्राचार्य सुनील काकडे या सर्वांचा विशेष जाहीर सत्कार करण्यात आला व या उज्वल यशाबद्दल यांचे अभिनंदन करण्यात आले.अशी माहिती प्रा अमोल कोलते पा. संस्था सचिव श्रीमती रत्‍नाबाई कोलते यांनी या निकालाबद्दल विशेष असे मत व्यक्त केले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२वी च्या परीक्षेत यंदाही विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. निकालात मुलींनी पुन्हा बाजी मारली असून अनेक महाविद्यालयांचा निकाल १००% लागला आहे. संस्था सचिव

ग्रामीण भागाची झेप: शहरांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

विविध शाखा: विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः विज्ञान शाखेचा निकाल लक्षवेधी ठरला.

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुरवणी परीक्षेची तयारी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बारावीची परीक्षा हे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी-मित्रांचे, त्यांच्या आई-वडिलांचे आणि गुरुजनांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या पुढील स्वप्नांना नवी उंची मिळो, हीच सदिच्छा.

उज्वल यशाची ही परंपरा अशीच कायम राहो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार