Home / Uncategorized / इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात प्रा.के डी.निमगडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न..!

इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात प्रा.के डी.निमगडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न..!

 

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

जामनेर : इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा.केशव दत्तू निमगडे यांनी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय नियमानुसार दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा कार्याचा कृतज्ञता सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला.

गणितासारख्या कठीण विषयाचे सुलभ अध्यापन करून प्रा.निमगडे यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सहपत्नीक सौ.वर्षा केशव निमगडे (प्राथमिक उपशिक्षिका) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा.डी.झेड. गायकवाड, पर्यवेक्षक प्रा.जी.जी. अत्तरदे, प्रा.व्ही.बी.पाटील, ज्येष्ठ शिक्षक प्रा.के.एन.मराठे, प्रा.शरद पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, साडी, ड्रेस, टॉवेल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रा.के.एन.मराठे यांनी प्रा. निमगडे यांच्यासोबतचे आठवणींचे क्षण उलगडले, तर प्रा.सविता महाजन यांनी त्यांच्या कार्यकौशल्य व ज्ञानदानाबद्दल मनोगत व्यक्त केले. गणित विभागाकडून प्रा.आर.आर. पाटील यांनी सहकारी म्हणून त्यांच्या जीवनाची त्यांच्या मार्गदर्शनाची आठवण करून दिली.

यानंतर प्रा.के.डी.निमगडे यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचे (जीवनपट) सादरीकरण करून आपल्या सेवाकाळातील अनुभव,आठवणी व शैक्षणिक व जीवनाचा संघर्षमय प्रवास उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमादरम्यान उपक्रमशील उपशिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी १५३ छायाचित्रांचा सिनेमॅटिक व्हिडिओ सादर करून प्रा.निमगडे यांच्या महाविद्यालयातील जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. यात शैक्षणिक सहली, स्पर्धा, वृक्षारोपण व इतर उपक्रमांचा समावेश होता.

इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण व उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे यांनी प्रा.निमगडे यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.रूपाली पाटील यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार