Home / Uncategorized / फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दिन वंदे मातरम् गीताने परिसर दणाणला ..

फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दिन वंदे मातरम् गीताने परिसर दणाणला ..

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सपोनि अंकुश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण; मान्यवरांची उपस्थिती

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन अगोदर वंदे मातरम् गीत गायन झाले देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण साजरे करण्यात आले शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ७:०५ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सपोनि अंकुश जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यापूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन सपोनि अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी पोलीस हवालदार प्रवीण चौधरी,गणी तडवी, किशोर राठोड, पोलिस अंमलदार सचिन अहिरे इतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास आणि विकासाचा आढावा घेत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुख कामकाज आणि नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार सपोनि अंकुश जाधव यांच्या कडून व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे पोलिस अंमलदार गणी तडवी यांच्या कडून आभार मानण्यात आले आणि राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार