Home / Uncategorized / खुलताबाद येथे वर्षभर सासऱ्याकडुन सुनेवर लैंगिक अत्याचार; पतीचाही मोठा पाठींबा, संतापजनक प्रकार उघड..!

खुलताबाद येथे वर्षभर सासऱ्याकडुन सुनेवर लैंगिक अत्याचार; पतीचाही मोठा पाठींबा, संतापजनक प्रकार उघड..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील शहरात एका २३ वर्षीय विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संतापजनक कृत्याला स्वतःच्या पतीचाही पाठींबा असल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.

 

बदनामीच्या भीतीने वर्षभर सहन केला अत्याचार; सासरा अटकेत तर पती फरार खुलताबाद शहरातील खर्डी रोडलगतच्या राजीव गांधी नगर परिसरातील रहिवासी आहे. तिचा विवाह ११ डिसेंबर २०१९ रोजी झाला असून ती पती, सासू-सासरे व तीन लहान मुलांसह राहत होती. तिचा पती स्थानिक हॉटेलमध्ये नोकरी करत होता. फिर्यादीतून, सुमारे एक वर्षांपासून सासरा तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. पती नाईट ड्युटीवर गेल्यानंतर सासरा वारंवार धमकावून तिच्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. असल्याचा आरोप आहे. पीडितेने हा प्रकार सासूला सांगितला असता, तिने कोणाला काही न सांगण्याचा सल्ला देत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पीडितेने हा प्रकार पतीलाही सांगितला. मात्र, त्यानेही वडिलांची पाठराखण करत तिला सासऱ्याच्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप आहे. त्यानंतर पतीने दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून सुमारे चार महिन्यांपूर्वी घर सोडले. पती गेल्यानंतर अत्याचाराची तीव्रता अधिक वाढली. सासू झोपल्यानंतर सासरा दररोज जबरदस्ती करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, पीडितेने एका महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला. सामाजिक बदनामीची भीती आणि स्वतःच्या वडिलांच्या आजारपणामुळे पीडितेने हा प्रकार गुप्त ठेवला होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी माहेरी गेल्यानंतर तिने धाडस करून आई व भावाला सर्व प्रकार सांगितला. १४ एप्रिल २०२६ रोजी सासू-सासरे तिला नेण्यासाठी आले असता सासन्याने “माझा मुलगा नसला तरी मी तिला सांभाळतो” असे वक्तव्य केले. यामुळे संतप्त कुटुंबीयांनी पीडितेला विश्वासात घेऊन संपूर्ण घटना जाणून घेतली व थेट पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सासऱ्याविरुद्ध बलात्काराचा व पतीविरुद्ध गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून पतीचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार